पालिका प्रशासन/नवी मुंबई : सिडकोने त्यांच्या मालमत्तेवरून मालकी हक्क सोडला असून, सदर मालमत्ता आणि त्याखालील जमिनी ‘फ्री होल्ड’ झाल्या असून, भविष्यात सदर मालमत्ताबाबत व्यवहार तसेच पुनर्विकास करताना, कोणत्याही प्रकारचे नियंत्रण सिडकोचे राहणार नाही. असा निर्णय नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष आ. संजय शिरसाट यांनी मुंबई येथे 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या बोर्ड मीटिंग मध्ये घेतला असल्याचे कळते. तर, हा निर्णय उद्या बुधवार/गुरुवार यादिवशी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मांडून संबंधित शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तदनंतर, राज्यपालांचा स्वाक्षरीने सदर निर्णयाची अंमलबजवणी होईल.
परंतु, सदर निर्णयासंबंधित कोणतेही अधिकृत प्रसिद्ध पत्र सिडको प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांना अद्यापही प्राप्त झालेले नाही. त्यामुळे, सिडको मालमत्ता विक्री करताना ‘ट्रान्सफर चार्जेस’ रद्द करणे अथवा मालमत्ता ‘फ्री होल्ड’ करण्याबाबतचे अध्यक्ष शिरसाट यांचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे व्यक्त केलेल्या विधान निव्वळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली स्टंटबाजी असल्याची चर्चा रंगली आहे.

