1–2 minutes

पालिका प्रशासन/नवी मुंबई : सिडकोने त्यांच्या मालमत्तेवरून मालकी हक्क सोडला असून, सदर मालमत्ता आणि त्याखालील जमिनी ‘फ्री होल्ड’ झाल्या असून, भविष्यात सदर मालमत्ताबाबत व्यवहार तसेच पुनर्विकास करताना, कोणत्याही प्रकारचे नियंत्रण सिडकोचे राहणार नाही. असा निर्णय नवनिर्वाचित सिडको अध्यक्ष आ. संजय शिरसाट यांनी मुंबई येथे 1 ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या बोर्ड मीटिंग मध्ये घेतला असल्याचे कळते. तर, हा निर्णय उद्या बुधवार/गुरुवार यादिवशी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीत मांडून संबंधित शासन निर्णय निर्गमित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तदनंतर, राज्यपालांचा स्वाक्षरीने सदर निर्णयाची अंमलबजवणी होईल.

परंतु, सदर निर्णयासंबंधित कोणतेही अधिकृत प्रसिद्ध पत्र सिडको प्रशासनाकडून प्रसारमाध्यमांना अद्यापही प्राप्त झालेले नाही. त्यामुळे, सिडको मालमत्ता विक्री करताना ‘ट्रान्सफर चार्जेस’ रद्द करणे अथवा मालमत्ता ‘फ्री होल्ड’ करण्याबाबतचे अध्यक्ष शिरसाट यांचे इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडे व्यक्त केलेल्या विधान निव्वळ विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेली स्टंटबाजी असल्याची चर्चा रंगली आहे.


One response to “सिडको मालमत्ता ‘फ्री होल्ड’ आणि ‘ट्रान्सफर चार्जेस’चा निर्णय राजकीय स्टंटबाजी(?)”

  1. श्रीधर मढवी avatar
    श्रीधर मढवी

    मूळ गावठणातल्या जमिनींवर बांधलेली (अनधिकृत?) घरे नियमित करण्याच्या धोरणात फसवेपणा दिसत आहे. कोणीही स्पश्टपणे बोलत नाही की गावकऱ्यांच्या २०० स्के.मीटर पर्यंतच्या घरांना नियमित करताना किती पैसे भरावे लागतील? ते सांगायला पाहिजेच पाहिजे. मोठा प्रश्न हा आहे की गावकऱ्यांनी ते स्वतःच्या जमिनीसाठी पैसे का भरावे? आधी शेतकरी मालक आहे. सिडको नंतर आलेली आहे. कोणीतरी स्पश्ट करावे. उगाच भिजत घोंगडे ठेवू नका. नाहीतर भरोसा उडेल सर्वांचा.

    Like

Leave a reply to श्रीधर मढवी Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started