प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई काँग्रेस कमिटीमधील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असून,महाविकास आघाडीचे 150 ऐरोलीचे उमेदवार मनोहर मढवी व 151 बेलापूरचे उमेदवार संदीप नाईक यांच्या विजयासाठी काँग्रेसने संकल्प केला आहे. आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन वाशी या मध्यवर्ती कार्यालयात अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे प्रभारी केरळचे आमदार सजीव जोसेफ यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठका घेण्यात आल्या.
सदर बैठकी दरम्यान प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत, येणाऱ्या काळात काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रचारात स्वतःला झोकून देऊन जोमाने कामाला लागतील; काँग्रेसच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघात फ्रंटल सेलच्या माध्यमातून विविध प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार; काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे इतर मित्र पक्ष गद्दारांचा पंचनामा व लोकसेवेची पंचसूत्री यांचे घरोघरी वाटप करणार; दोन्ही विधानसभा मतदारसंघात समन्वयासाठी समन्वय समितीचे गठन करण्यात आले.
याप्रसंगी, मत व्यक्त करताना सजीव जोसेफ यांनी सांगितले की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने लवकरच प्रभारी अध्यक्ष नियुक्त करण्यात येणार असल्याचे कळविलेले आहे. या बैठकांना ऐरोली विधानसभेचे उमेदवार मनोहर मढवी, बेलापूर विधानसभेचे उमेदवार संदीप नाईक, समन्वयक राहुल पिंगळे, प्रदेश पदाधिकारी अंकुश सोनवणे, जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष अरविंद सावंत, प्रदेश पदाधिकारी आबा दळवी,आनंद सिंग, AICC प्रवक्ते नासीर शेख ,महिला अध्यक्ष पूनम पाटील, इंटक अध्यक्ष रवींद्र सावंत, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष अन्वर हवालदार, लीला लिमये, उज्वला सावळे,सनी थॉमस,अमित पाटील,सूरज देसाई,महेश भणगे, ब्लॉक ,सेल व फ्रंटल अध्यक्ष व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


