2–3 minutes

नवी मुंबई/पालिका प्रशासन : महाराष्ट्र राज्यातील 21 व्या शतकातील व मिनी इंडिया म्हणून ओळख असलेले शहर म्हणजे नवी मुंबई परंतु ही नवी मुंबई ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या त्यागातून व सहकार्यातून बनली त्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या आजतागयत अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले गेले अंदाजे 40 वर्षे हे स्थानिक भूमिपुत्र शासनाकडून उपेक्षितच राहिले गेले आहेत. ज्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी आपल्या शेतजमिनी 100% शासनाला दिली असून त्यांच्या माध्यमातून एक सुंदर टुमदार शहर वसविण्यात आले. परंतु, आजही त्यांना त्यांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्यासाठी करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. मग त्यांच्या व्यवसायाचा प्रश्न असेल, नोकऱ्यांचा प्रश्न असेल, शिष्यवृत्ती बाबतचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्नांना त्यांना तोंड द्यावे लागले आहे.

परंतु, आता लवकरच त्यांचा मागील 40 वर्षे प्रलंबित असलेला गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. सन 2004 रोजी विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून निवडून आल्यापासून ते 2014 व 2019 मध्ये पुन्हा बेलापूर विधानसभेतून दोन वेळा निवडून गेल्यावर गेले 20 वर्षे सातत्याने आमदार मंदाताई म्हात्रे या प्रश्नाकरिता पोट तिडकीने शासन दरबारी लढा देत आल्या आहेत. सन 2015 मध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी च्या मार्फत प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधून त्या संदर्भातील नियमावली तयार करून अंदाजे 500 चौरस फुटाचे घर व त्या घरासमोरील मोकळी जागा गृहीत धरावे यासाठी पाठपुरावा केला. सन 2019 रोजीच्या निवडणुकीपूर्वी ही तत्कालीन माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पाठपुरावा करून सदर बाबतचा शासकीय अध्यादेश काढण्याकरिता प्रश्न उपस्थित केला होता परंतु प्रशासकीय यंत्रणेच्या चौकटीत अडथळा आल्यामुळे तो प्रश्न थोडा बालकला गेला होता. परंतु आमदार मंदाताई म्हात्रे यांनी त्याचा पाठपुरावा आजतागयत सुरूच ठेवला. त्याचबरोबर नवी मुंबातील स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते रामचंद्र घरत, सुनिल पाटील, डॉ. राजेश पाटील, शिवराम पाटील, विलास भोईर अशा अनेक प्रकल्पग्रस्त नेत्यांनी मला साथ दिल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना या प्रश्नाबाबत दिनांक 23/03/2022 व 16/7/2022 रोजी पत्र व्यवहार केला होता व त्याच अनुषंगाने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी गणेशोत्सव काळामध्ये गणेश दर्शनानिमित्त माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेऊन याबाबतचा लवकरात लवकर शासकीय अध्यादेश काढावा यासाठी विनंती केली होती व त्यावेळी दोन्ही मान्यवरांनी तुम्हाला व तुमच्या नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त बांधवांना गणेशोत्सवाची गोड भेट देऊ असे आश्वासन दिले होते. त्यानुसार लवकरच नवी मुंबईतील मागील 40 वर्षे प्रलंबित असलेला स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा गरजेपोटी बांधलेली घरे कायमस्वरूपी करण्याचा मार्ग मोकळा होणार असून लवकरच त्याबाबत शासकीय अध्यादेश काढला जाणार असल्याची माहिती आमदार म्हात्रे यांनी दिली आहे.

तसेच नवी मुंबईतील स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते रामचंद्र घरत, सुनिल पाटील, डॉ. राजेश पाटील, शिवराम पाटील, विलास भोईर अशा अनेक प्रकल्पग्रस्त नेत्यांनी मला साथ दिल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले आहे. तसेच तमाम प्रकल्पग्रस्त व आमदार संबंधाचे म्हात्रे यांनी मागील अनेक वर्ष हा लढा देऊन अखेरीस दिव्यस्वप्न पूर्ण होणार यामुळे सर्व प्रकल्पग्रस्त बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे व हा निर्णय झाल्यावर आमदार मंदाताई मात्रे यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री चे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा भव्य नागरिक सत्कार प्रकल्पग्रस्त बांधवांकडून केला जाणार असल्याचे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.


2 responses to “नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरे लवकरच कायमस्वरूपी सुरू होणार – आ. मंदाताई म्हात्रे”

  1. Sudhir Dani avatar
    Sudhir Dani

    निर्णयाचे स्वागतच पण तो केवळ चूनावी जुमला ठरू नये एवढीच माफक अपेक्षा

    Like

  2. पियुष कोळी avatar
    पियुष कोळी

    आमदार सौ मंदाताई आहेत म्हणून प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागत आहे. आज नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त बांधवांनी गरजेपोटी बांधलेली घरे लवकरच कायमस्वरूपी सुरू होणार आहेत. यामुळे आमदार मंदाताई म्हात्रे यांचे आभार व्यक्त करतो.

    Like

Leave a reply to Sudhir Dani Cancel reply

Design a site like this with WordPress.com
Get started