1–2 minutes

प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : नवी मुंबई महानगरपालिकेकडून १ ऑक्टोबर रोजी  ‘स्वच्छता ही सेवा’ उपक्रमात रस्त्यावर उतरून केले ‘एक साथ एक तास श्रमदान’ अंतर्गत जाहीर करण्यात आलेल्या आकड्यांमध्ये गफलत असून, कोणतीही नोंदणी अथवा कोणत्याही प्रकारच्या मोजणीशिवाय हवेतल्या हवेत १ लाख २८ हजार नागरिकांनी सदर उपक्रमात आपला सहभाग दर्शविल्याची सांख्यिक आकडेवारी महानगरपालिकेतारे जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे, हा थेट सांख्यिक घोटाळा असल्याचे दिसून येत आहे. 

नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा महानगरपालिकेने निश्चित केलेल्या 267 ठिकाणी तसेच इतर शासकीय व खाजगी कार्यालये, सोसायट्या, संस्था यांच्या वतीने करण्यात आलेल्या स्वच्छता मोहीमांमध्ये 1 लाख 28 हजारहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतल्याचे महानगरपालिकेच्या प्रसिद्धी पत्रकार नमूद करण्यात आले होते.

परंतु, प्रसिद्धी पात्रातील आकडेवारी हि कोणत्या पद्धतीने अंतिम करण्यात आली आहे, यावर महानगरपालिकेने मौन बाळगले आहे. त्यामुळे, १ लाख २८ हजार नागरिकांचा सहभाग दाखवून त्यांना देण्यात आलेल्या सेवा- सुविधांबाबत खर्च दाखवून आर्थिक लूट करण्याचा संबंधित विभागाचा उद्देश दिसत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.

एक तास श्रमदानाने विडिओ कुठे आहेत?

‘एक साथ एक तास श्रमदान’ या उपक्रमांतर्गत एक तास स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग असल्याचा एकही विडिओ उपलब्ध नाही. त्यामुळे, महापालिकेच्या अधिकाऱ्यानी फक्त फोटोसेशनसाठी झाडू हातात घेत रस्त्याव्यतिरिक्त पदपथ स्वच्छ केल्याचा बनाव उघड झाला आहे. 


Design a site like this with WordPress.com
Get started