प्रतिनिधी (पालिका प्रशासन) : वाशी सेक्टर- 17च्या राजमाता जिजाबाई भोसले चौक ते गोल्डन पंजाब हॉटेल ते माधवराव सिंधिया चौकादरम्यानच्या रस्त्याच्याकडेला बेकायदेशीरपणे वाहने उभारणीसाठी प्रतिमाहिना हफ्ते बांधून, वाहतूक पोलिसांनी दिलेली मौखिक परवानगी रद्द करावी. आणि, सदर मोकळा श्वास घेण्यासाठी व पायी चालणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्याचे सहकार्य करावे.
नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी सेक्टर- 17 मधील डांबरी रस्ते कोट्यवधी खर्च करून धावत्या वाहनांसाठी आणि आवश्यकतेनुसार नागरिकांना पायी चालण्यासाठी निर्माण केले आहे. मात्र, याच रस्त्यांवर येथील वाहतूक पोलीसांनी (विशेषतः टोविंग व्हॅन वर रुजू असणारे पोलिसांनी) गॅरेज, वाहन सजावट आणि डबल (दुहेरी) पार्किंग इत्यादींना बेकायदेशीरपणे आपला व्यवसाय थाटण्यास महिना आर्थिक हफ्ता बांधून परवानगी दिली आहे. त्यामुळे, नागरिकांच्या टॅक्सरुपी पैशातून निर्माण केलेल्या रस्त्याचा बेकायदेशीरपणे वापर परवाना देवून, वाहतूक पोलीस आपली व्यक्तिगत गंगाजळी भरत आहे. ज्यावर, कायमस्वरूपी अंकुश लावणे गरजेचे आहे.


