1–2 minutes

पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला वेग आला असताना, सीबीडी भागातील पॅनल क्रमांक ’28 ब’ हा वार्ड ओबीसी महिलांसाठी आरक्षित असल्याने येथे महाविकास आघाडीतील (MVA) दोन पक्षांचे उमेदवार आमने-सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या दोन्ही पक्षांकडून या वार्डातून उमेदवारीसाठी इच्छुकांची नावे पुढे आली आहेत. शरद पवार गटातर्फे अस्मिता प्रशांत पाटील तर मनसेकडून डॉ. आरती धुमाळ यांच्यासारख्या इच्छुकांनी आपली तयारी दर्शवली आहे.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात या वार्डाची उमेदवारी कोणत्या पक्षाला मिळेल, यावरून अंतर्गत चर्चा सुरू आहे. दोन्ही पक्ष MVA भाग असल्याने एकमेकांसमोर उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा सुरू असल्याचे चित्र आहे. यामुळे मतविभागणी होऊन भाजपाच्या संभाव्य उमेदवार, माजी नगरसेविका स्वाती गुरखे,-साटम यांना विजय मिळवणे सोपे जाईल, अशी चर्चा सीबीडी परिसरात जोरात सुरू आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीत अशा अंतर्गत वादांमुळे महाविकास आघाडीला धक्का बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येत्या काही दिवसांत जागावाटप निश्चित झाल्यानंतरच येथील चित्र स्पष्ट होईल.


Design a site like this with WordPress.com
Get started