पालिका प्रशासन/नवी मुंबई : अपोलो हॉस्पिटल्स नवी मुंबईने बिलियन हार्ट्स बीटिंग फाउंडेशनच्या वतीने तीन प्रगत जीवन-समर्थन रुग्णवाहिकांचे अधिकृत उद्घाटन केले. हा सीएसआर उपक्रम प्रदेशातील आपत्कालीन वैद्यकीय सेवांना बळकटी देण्यासाठी आहे. या रुग्णवाहिकांमुळे गंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्याची क्षमता वाढेल. यापूर्वीच या रुग्णवाहिकांचा वापर नवी मुंबईतील वैद्यकीय शिबिरांमध्ये करण्यात आला असून, त्यांनी २३ हजारांहून अधिक लोकांना सेवा दिली आहे.
उद्घाटन प्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिम विभागाचे सीईओ श्री. अरूनेश पुनेथा म्हणाले, “रुग्णालयाबाहेरही आपत्कालीन सेवांची साखळी मजबूत करणे हा आमचा ध्येय आहे. या प्रगत रुग्णवाहिकांमुळे जीवन वाचवण्याच्या सुरुवातीच्या क्षणांत रुग्णांपर्यंत पोहोचणे सोपे होईल. आरोग्य संस्था आणि उदार दात्यांच्या सहकार्यातून समाजासाठी मोठे योगदान देता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.”
बिलियन हार्ट्स बीटिंग फाउंडेशनच्या सीएसआर ऑपरेशन्स प्रमुख सुश्री सुधा झिजारिया यांनी सांगितले, “आमचे यश मदत किती वेगाने पोहोचते यावर अवलंबून आहे. या रुग्णवाहिका वैद्यकीय संकट आणि उपचारांमधील दरी भरून काढतील. घरापासून रुग्णालयापर्यंत आणि शहरापासून ग्रामीण भागापर्यंत सेवा पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
अपोलो हॉस्पिटल्सच्या पश्चिम क्षेत्रातील आपत्कालीन विभागाचे संचालक डॉ. नितीन जगताप यांनी प्री-हॉस्पिटल केअरच्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “आपत्कालीन उपचार रुग्णालयात नव्हे, तर मदतीचा पहिला कॉल आल्यापासून सुरू होतात. या रुग्णवाहिका चालत्या अतिदक्षता विभागासारख्या असून, तज्ज्ञ उपचार तत्काळ देतील. हा सहयोग आमच्या सेवा अधिक व्यापक करेल आणि जीवन वाचवण्याचे ध्येय साध्य करेल.”
हा उपक्रम अपोलो हॉस्पिटल्स आणि त्याच्या फाउंडेशनच्या समाजसेवेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. नवी मुंबईसह आसपासच्या भागातील नागरिकांना याचा मोठा फायदा होईल.

अपोलो हॉस्पिटल्सला बिलियन हार्ट्स बीटिंग फाउंडेशनकडून तीन प्रगत रुग्णवाहिका
1–2 minutes
