पालिका प्रशासन/सुदिप घोलप : आगामी नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सीबीडी बेलापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा युवा नेते प्रशांत वाघ हे पॅनल क्रं. २८ (क) मधून काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची जोरदार चर्चा आहे.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशनमध्ये बी.ई. पूर्ण केलेले अभियंता प्रशांत वाघ यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात थेट काँग्रेसमधून केली आहे. भारती विद्यापीठाचे संस्थापक आणि माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचे ते निकटवर्तीय होते, तर सध्याचे आमदार विश्वजित कदम यांचे खंदे समर्थक आणि माजी नगरसेवक विलासराव कदम यांचा आशीर्वाद असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे.
सीबीडी बेलापूर हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो. येथे एकेकाळी काँग्रेसचे दोन नगरसेवक निवडून आले होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून यंदा प्रशांत वाघ यांना संधी मिळावी यासाठी काँग्रेससह आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकमताने प्रयत्नशील आहेत.
उत्तम शिक्षित आणि तरुण चेहरा असल्याने नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूनम पाटील या देखील प्रशांत वाघ यांच्या उमेदवारीला सकारात्मक असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. यामुळे सीबीडी पॅनल क्रं. २८ (क) मधील लढत आता अधिक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.

‘प्रशांत वाघ’ काँग्रेसकडून सीबीडी पॅनल क्रं. २८(क) मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक
No comments on ‘प्रशांत वाघ’ काँग्रेसकडून सीबीडी पॅनल क्रं. २८(क) मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक
1–2 minutes
