पालिका प्रशासन : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यासाठी सीबीडी पोलीस ठाण्याच्या वतीने ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. ही 2 किलोमीटरची मॅरेथॉन सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान सीबीडी परिसरात पार पडली.
या उपक्रमात सीबीडी भागातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, राजकीय नेते तसेच सीबीडी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि अंमलदार यांचा उत्साहपूर्ण सहभाग होता. एकूण 100 हुन अधिक नागरिकांनी या उपक्रमात भाग घेऊन राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. मॅरेथॉनच्या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्ती आणि एकतेची भावना जागृत करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. पोलिसांनी नागरिकांना एकत्र आणून सामाजिक सौहार्द वाढवण्याचे कौतुकोद्गार व्यक्त केले जात आहेत. राष्ट्रीय एकता दिवसाच्या निमित्ताने असे उपक्रम भविष्यातही सुरू राहतील, अशी ग्वाही श्री. पवार यांनी दिली.


