1–2 minutes

पालिका प्रशासन : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली २७ ऑगस्टपासून अंतरवली सराटी, जालना येथून मुंबईकडे निघालेले आंदोलक २८ ऑगस्ट रोजी नवी मुंबईत दाखल होणार आहेत. यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने वाहतूक नियंत्रण अधिसूचना जारी केली आहे.

पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम ११५, ११६(१)(अ)(ब), ११७ अंतर्गत २८ ऑगस्ट सकाळी १० वाजल्यापासून ते २९ ऑगस्टपर्यंत नवी मुंबईत सर्व जड-अवजड आणि मालवाहू वाहनांना प्रवेश, मार्गस्थ होणे आणि पार्किंगवर पूर्ण बंदी घातली आहे. ही बंदी जीवनावश्यक वाहने, पोलीस, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय वाहने, मराठा आंदोलकांची वाहने आणि प्रवासी बस यांना लागू होणार नाही. तरी, नागरिकांना वाहतूक नियोजनात सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started