पालिका प्रशासन : दिग्दर्शक हर्षल राणे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘भस्मांचल’ यां ‘नाटकाचा भव्य प्रीमियर शो २५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ६:३० वाजता नवी मुंबईतील वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रंगकर्मी, कलारसिक आणि समाजमन यांना एकत्र आणणारी सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
महाराणी प्रस्तुत “एव्हरी रिंकल टेल्स अ स्टोरी” ही एक अनोखी रंगकृती रंगभूमीवर साकार होत आहे. “भस्मांचल” – हे केवळ एक नाटक नाही, तर विसरलेल्या मुळांचा, हरवलेल्या ओळखीचा आणि काळाच्या प्रवाहात झिजलेल्या नात्यांचा हळुवार आविष्कार आहे.
“मुळे विसरली की कितीही बळकट झाडं असली तरी ती कोसळतात,” असा सखोल विचार मांडणारी ही रंगकृती प्रेक्षकांना भावनिक आणि वैचारिक प्रवासात घेऊन जाणार आहे. या नाटकाची संकल्पना मोहन नायर यांची असून, दिग्दर्शनाची जबाबदारी हर्षल राणे यांनी सांभाळली आहे. सह-दिग्दर्शिका म्हणून रेवती आढाव आणि रेणू जैन, भावना सूर्यवंशी यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. विशेष म्हणजे, रेवती आढाव यांचे ‘रेणूजी’च्या सशक्त भूमिकेतील प्रभावी सादरीकरण प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
तर, ही संध्याकाळ केवळ एक प्रीमियर शो नसून, आपल्या सांस्कृतिक मुळांशी पुन्हा जोडणारा आणि मनाला स्पर्श करणारा एक अविस्मरणीय रंगप्रवास असेल. स्पॉन्सरशिप, पासेस आणि स्वयंसेवकांसाठी ८४३३७५८३७५ यावर संपर्क करावा.

