1–2 minutes

पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 20 ऑगस्ट सकाळी 8:30 ते 21 ऑगस्ट दरम्यान, सकाळी 8:30 या 24 तासांत सरासरी 26.93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामध्ये नेरूळ येथे सर्वाधिक 38.80 मिमी, तर वाशी येथे सर्वात कमी 19.40 मिमी पावसाची नोंद झाली. बेलापूरमध्ये 21.40 मिमी, कोपरखैरणे येथे 30.60 मिमी, ऐरोली येथे 25.20 मिमी आणि दिघा येथे 26.20 मिमी पाऊस पडला.

मोरबे धरण परिसरात गेल्या 24 तासांत 57.00 मिमी पावसाची नोंद झाली असून, 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 2978.60 मिमी पावसाची नोंद आहे. धरणाची जलपातळी 88.04 मीटरवर पोहोचली असून, धरण 100.20% भरले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 1 जून पासून आतापर्यंत एकूण 2349.36 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज सकाळी 11:01 वाजता 4.27 मीटर आणि रात्री 10:57 वाजता 3.74 मीटर उंचीची भरती येणार आहे.

गेल्या 24 तासांत शहरात झाडांच्या मोठ्या फांद्या पडण्याच्या 4 घटना घडल्या, तसेच 1 अग्निशमन घटना आणि 1 ठिकाणी स्लॅबचे प्लास्टर पडण्याची घटना नोंदवली गेली.

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत मध्यवर्ती आपत्ती नियंत्रण केंद्राशी संपर्क साधण्यासाठी 022-27567060/61 किंवा टोल फ्री क्रमांक 1800222309/10 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started