1–2 minutes

पालिका प्रशासन : सीबीडी उड्डाणपुलावर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर आज (21 ऑगस्ट संध्याकाळी 6.45 वा)एका डिझेल वाहतूक करणाऱ्या टँकरमधून धूर निघत असल्याची घटना घडली. पत्रकार सुदिप घोलप यांच्या प्रसंगावधान आणि सीबीडी ट्राफिक पोलीस तसेच नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे संभाव्य आगीचा धोका टळला.

सुदिप घोलप यांनी उड्डाणपुलाच्या उतरणीवर एचपीसीएल कंपनीच्या रिकाम्या डिझेल टँकरमधून धूर निघत असल्याचे पाहिले. त्यांनी तातडीने सीबीडी ट्राफिक पोलीस आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला समक्ष जाऊन याबाबत माहिती दिली. त्यांच्या सतर्कतेमुळे दोन्ही विभागांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली.

अग्निशमन दलाने टँकरवर पाण्याचा फवारा मारून आगीची शक्यता पूर्णपणे टाळली, तर सीबीडी ट्राफिक पोलिसांनी घटनेमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी डायव्हर्ट करून मार्ग मोकळा केला. या तत्पर कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.

पत्रकार सुदिप घोलप यांनी केवळ घटनेची तत्काळ माहिती दिली नाही, तर स्वतः घटनास्थळी थांबून प्रशासनाला सहकार्यही केले. त्यांच्या या प्रसंगावधान आणि जबाबदारीच्या जाणिवेचे अग्निशमन दल आणि सीबीडी ट्राफिक पोलिसांनी विशेष आभार मानले. या घटनेमुळे सतर्क नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणांच्या समन्वयाचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started