पालिका प्रशासन: वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. 22 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन, तलाव पाळीजवळ, डॉ. मूस मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे “जनता दरबार” आयोजित करण्यात आला आहे. या जनता दरबारामध्ये नागरिकांना आपल्या समस्या मांडण्याची आणि त्यावर तात्काळ निपटारा मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
मंत्री कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, या जनता दरबारात नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या तक्रारी आणि समस्यांचे निवेदन मांडावे, जेणेकरून त्यांच्या अडचणींवर त्वरित कार्यवाही करता येईल. नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी हा जनता दरबार आयोजित करण्यात आला असून, यामुळे प्रशासकीय स्तरावर तातडीने उपाययोजना करणे शक्य होईल, असे मंत्री कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
ठाणे शहरातील नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन वनमंत्री गणेश नाईक यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. जनता दरबारामुळे नागरिक आणि प्रशासन यांच्यातील दरी कमी होऊन तक्रारींचे त्वरित निराकरण होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

