पालिका प्रसासन : सॅटर्डे क्लब
नवी मुंबई रिजनल यांच्या माध्यमातून, गौरी-गणपती उत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू, सेवा आणि उत्पादनांच्या विक्रीचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १९ आणि २० ऑगस्ट (मंगळवार, बुधवार) या दोन दिवशी नवी मुंबईतील तुर्भे येथील रूपा रेनीसन्स याठिकाणी वातानुकूलित हॉलमध्ये होणार आहे.
या प्रदर्शनात गौरी-गणपती उत्सवाशी व घरगुती संबंधित विविध वस्तू, सेवा आणि उत्पादने उपलब्ध असतील. नवी मुंबईकरांना या प्रदर्शनाला भेट देऊन उत्सवासाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंची खरेदी एकाच ठिकाणी करण्याची संधी मिळणार आहे.
सॅटर्डे क्लब नवी मुंबई रिजनल एकच्या वतीने सर्व नवी मुंबईकरांना या दोन दिवसीय प्रदर्शनात सहभागी होण्याचे आणि मराठी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठी उद्योजकांना सक्षम करण्यासाठी आणि उत्सवाचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी या प्रदर्शनाला भेट देण्याचे निमंत्रण आयोजकांनी दिले आहे.
नवी मुंबईकरांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून गौरी-गणपती उत्सवाची तयारी अधिक उत्साहपूर्ण करावी, अशी आयोजकांनी आवाहन केले आहे. तर, या प्रदर्शनाला येणाऱ्यांसाठी मोफत प्रवेश असून, भरघोस डिस्काउंट, उत्तम क्वालिटीचे नामांकित ब्रँड्स, लाईव्ह डेमोस्ट्रेशन आणि ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंग सुविधा उपलब्ध असणार आहे.
Location – https://share.google/D1I8wSkpNAhShPNvE

