पालिका प्रशासन: भारतीय हवामान खात्याने महाराष्ट्रात दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळा आणि विद्यालयांना उद्या, 19 ऑगस्ट 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण उपायुक्तांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.
या पत्रानुसार, पालकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी उद्या आपल्या मुला-मुलींना शाळेत पाठवू नये. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनी आणि शाळा प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक खबरदारी बाळगावी, असे महानगरपालिकेने कळविले आहे.


