1–2 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी मुंबईतील काँग्रेस भवन, वाशी येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. नवी मुंबई काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांनी ध्वज फडकावला आणि नागरिकांना प्रेरणादायी संदेश दिला.

नवी मुंबई काँग्रेसच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त वाशी येथील काँग्रेस भवन येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष पूनम पाटील यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस गुरवेंद्र सिंग बच्चन, सचिव मनोज उपाध्याय, प्रवक्ते नासिर हुसेन, तुर्भे ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड, बेलापूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत वाघ, अल्पसंख्याक नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अन्वर हवलदार, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रवी जाधव, NSUI चे रोहित ढेकळे, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस जोया शेख, बेलापूर महिला काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष साक्षी पाटील, नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दत्ता माने, नवी मुंबई जिल्हा युथ काँग्रेसचे सरचिटणीस विनोद पाटील, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभागाचे सचिव विजय पाटील आणि सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष सुनील वाडकर यांच्यासह अनेक प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते.

ध्वजारोहणानंतर उपस्थित नेत्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहिली. पूनम पाटील यांनी आपल्या प्रेरणादायी संदेशात स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि संविधानशिल्पी यांच्या बलिदानाला स्मरून देशप्रेम, एकता आणि सामाजिक समतेच्या मूल्यांवर आधारित समाजरचना करण्याचे आवाहन केले. त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले आणि काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय आणि विकासासाठीच्या योगदानावर जोर दिला.

इतर नेत्यांनीही आपल्या मनोगतात स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना समाजातील सर्व स्तरांतील लोकांना बरोबर घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प व्यक्त केला. पूनम पाटील म्हणाल्या, “नवी मुंबई हे केवळ एक शहर नाही, तर विविधतेत एकता आणि प्रगतीचे प्रतीक आहे. आपण सामाजिक समता, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एकजुटीने कार्य केले पाहिजे.”


Design a site like this with WordPress.com
Get started