1–2 minutes

पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेचे ‘रस्ते दुरुस्ती पथक’ सध्या ऍक्टिव्ह मोडमध्ये असून, मुसळधार पावसामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यासाठी हे पथक कार्यरत आहे.

नवी मुंबईत सध्या जोरदार आणि सातत्याने पडणाऱ्या पावसाने रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने आपले ‘रस्ते दुरुस्ती पथक’ कार्यान्वित केले आहे. या पथकामध्ये कनिष्ठ अभियंता, उपअभियंता आणि कार्यकारी अभियंता यांचा समावेश आहे, जे रस्त्यावर प्रत्यक्ष उपस्थित राहून दुरुस्तीच्या कामावर लक्ष ठेवत आहेत.

शहर अभियंत्यांकडून सातत्याने या कामाचा आढावा घेतला जात आहे, जेणेकरून दुरुस्तीचे काम जलद आणि प्रभावीपणे पूर्ण होईल. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, जर रस्त्यावर खड्डे पडले असतील किंवा रस्ता खराब झाला असेल, तर तात्काळ जवळच्या वॉर्ड ऑफिसशी संपर्क साधावा. अथवा महापालिकेच्या आपत्कालीन क्रमांक 02227567060/7061 अथवा 1800222309/1800222310 वर संपर्क साधावा. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रवास सुखकर व्हावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिका सातत्याने प्रयत्नशील आहे.

तर, नागरिकांना अखंडित आणि सुरळीत पाणीपुरवठा मिळावा, तसेच मलनिस्सारण वाहिन्या नवीन टाकून प्रक्रिया अद्यावत करण्यासाठी शहरात जागोजागी खोदकाम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते खराब झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, स्थापत्य विभागाच्या माध्यमातून सदर ठिकाणी रस्त्यांची दुरुस्ती करून ते रस्ते नागरिकांसाठी वापरण्यायोग्य व्हावेत, यासाठी काम सुरू आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started