पालिका प्रशासन : काँग्रेस युवक प्रदेश सचिव अश्विन अघमकर हे आपल्या कार्यकर्त्यांसह आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. यानिमित्त आज रविवार, २२ जून रोजी सायंकाळी पाच वाजता नेरुळ, नवी मुंबई येथील आगरी कोळी भवन येथे एका भव्य समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती ताई तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत उपस्थित राहणार आहेत.
अश्विन अघमकर यांच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नवी मुंबई आणि परिसरात अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या समारंभासाठी सर्वांना निमंत्रित करण्यात आले असून, मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहतील, अशी शक्यता आहे.

