पालिका प्रशासन : नेरूळ सेक्टर-30, भूखंड क्रमांक 8अ येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या शाळा इमारतीमध्ये CBSE माध्यमाची शाळा सुरू करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक विशाल डोळस यांनी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शिक्षण विभागाकडे केली आहे.
विशाल डोळस यांनी सांगितले की, सिवूड्स सेक्टर-50 (जुने) येथील CBSE शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांना दोन-दोन वर्षे प्रतीक्षा करावी लागते. यामुळे विद्यार्थी आणि पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. नेरूळ सेक्टर-30 येथील नवीन शाळा इमारतीत CBSE माध्यमाची शाळा सुरू केल्यास विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मोठा दिलासा मिळेल. यामुळे परिसरातील शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होईल आणि CBSE शिक्षणाची मागणी असलेल्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेशाची संधी उपलब्ध होईल, असेही डोळस यांनी नमूद केले.
या मागणीमुळे स्थानिक पालकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, महानगरपालिका प्रशासन आणि शिक्षण विभाग याकडे लक्ष लागले आहे.यामुळे परिसरातील पालक आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणाचा लाभ घेता येईल, असे डोळस यांनी आपल्या मागणीपत्रात नमूद केले आहे. स्थानिक नागरिकांनीही या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, सीबीएसई शाळेमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी प्रगती होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

