पालिका प्रशासन/क्राईम न्युज: नवी मुंबईतील नेरूल परिसरात एका ५६ वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात व्यक्तीने चोरल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नेरूल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुनिता शशिकांत भोसले (वय ५६, रा. इम्पिरियल सोसायटी, उलवे, रायगड) या ३१ मे २०२५ रोजी कामानिमित्त ठाणे येथून पनवेल लोकलने नेरूल रेल्वे स्टेशनवर आल्या होत्या. त्यानंतर त्या आपले पती शशिकांत यांच्यासह रिक्षाने नेरूल डी.वाय. पाटील कॉलेजसमोरील एल.पी. एस.टी. बस स्टॉपवर उतरल्या. यावेळी त्यांनी आपल्या हातातील सोन्याच्या बांगड्या तपासल्या असता, दोनपैकी एक बांगडी गहाळ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ही बांगडी अंदाजे २० ग्रॅम वजनाची असून, तिची किंमत सुमारे १ लाख ९० हजार रुपये आहे.सुनिता भोसले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाणे ते नेरूल प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नकळत ही बांगडी चोरली असावी. त्या ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचे कारण देताना त्यांनी सांगितले की, कार्यालयीन कामामुळे त्यांना तात्काळ तक्रार दाखल करता आली नाही.
सुनिता भोसले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, ठाणे ते नेरूल प्रवासादरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या नकळत ही बांगडी चोरली असावी. त्या ठाणे डिस्ट्रिक्ट कोर्टात वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याचे कारण देताना त्यांनी सांगितले की, कार्यालयीन कामामुळे त्यांना तात्काळ तक्रार दाखल करता आली नाही.
पोलिसांनी अज्ञात चोरट्याचा शोध सुरू केला असून, रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. नागरिकांना सावध राहण्याचे आणि मौल्यवान दागिने प्रवासादरम्यान सुरक्षित ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदर प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच आरोपीचा शोध लागेल, अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.

