पालिका प्रशासन : स्थानिक माजी नगरसेवक सुरज पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि प्रशासकीय पाठपुराव्यामुळे सारसोळे सेक्टर ६ येथील विघ्नहर सोसायटी ते नेरुळ सी व्ह्यू सोसायटी या मार्गावरील पदपथाच्या दुरुस्तीचे आणि स्टॅम्प कॉंक्रिटचे काम 3 जून रोजी ज्येष्ठ नागरिकांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
या नागरी सुविधेच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी सारसोळे ग्रामस्थ आणि सेक्टर ६ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुसज्ज पदपथ उपलब्ध होणार असून, स्थानिकांच्या दैनंदिन प्रवासात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून प्रशासनाकडून मंजुरी मिळवली. नागरिकांनी त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत या कामामुळे परिसराच्या विकासाला चालना मिळेल, असे मत व्यक्त केले.

