पालिका प्रशासन: डॉ. रुग्मणी वेंकटाद्री यांच्या मार्गदर्शनाखाली TRF सेंटर, सीबीडी येथे फॅब्रिक ज्वेलरी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सर्जनशील कार्यशाळा २७ (मंगळवार), २९ (गुरुवार) आणि ३१ (शनिवार) मे २०२५ रोजी दुपारी १२ ते ४ या वेळेत होणार आहे. कार्यशाळेचे ठिकाण सुनील गावसकर मैदानाजवळ, डब्ल्यू. अरुणकुमार वैद्य रोड, सेक्टर २, अलबेला मंदिरासमोर, सीबीडी येथे आहे.
या कार्यशाळेत सहभागींना कपड्यांपासून आकर्षक, हलकी आणि पर्यावरणपूरक दागिने बनवण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. फॅब्रिक, धागे, मणी आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून कानातले, गळ्यातले, बांगड्या आणि इतर ॲक्सेसरीज तयार करण्याचे तंत्र शिकवले जाईल. विशेष म्हणजे, जे सहभागी सर्व दिवस पूर्ण वेळ (प्रतिदिन ४ तास) प्रशिक्षणाला उपस्थित राहतील, त्यांना प्रतिदिन २४० रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जाईल.
या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी डॉ. आरती धुमाळ यांच्याशी ९९६७९५६९८६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. पर्यावरणपूरक सर्जनशीलतेचा अनुभव घेण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे.

