1–2 minutes

पालिका प्रशासन/सुदिप घोलप : नवी मुंबईच्या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील कॉलनी आणि झोपडपट्टी भागातील मतदारांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात नाराजी वाढत आहे. मतदारांचा आरोप आहे की, निवडणुकीच्या वेळी देशभक्ती आणि हिंदू धर्माच्या संरक्षणाच्या भावनात्मक मुद्द्यांचा वापर करून त्यांची मतं मिळवली जातात, मात्र त्यांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष केले जाते.

कॉलनी आणि झोपडपट्टी भागातील नागरिकांचे म्हणणे आहे की, रोजगाराच्या संधी, नागरी सेवा सुविधा आणि इतर गरजांकडे लोकप्रतिनिधींकडून कायमच दुर्लक्ष होते. “आम्हाला फक्त निवडणुकीत भावनात्मक आवाहन करून मतं मागितली जातात. प्रत्यक्षात बेरोजगारी, रस्ते, पाणी, स्वच्छता यासारख्या समस्यांवर कोणतेही ठोस पाऊल उचलले जात नाही,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.

या भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत कोणतीही प्रभावी योजना राबवली गेली नसल्याची खंतही व्यक्त होत आहे. “आम्हाला देशभक्ती आणि धर्माच्या नावावर मतं द्यायला सांगितलं जातं, पण आमच्या मुलांना नोकऱ्या आणि आमच्या वस्त्यांना मूलभूत सुविधा कधी मिळणार?” असा सवाल झोपडपट्टीतील एका मतदाराने उपस्थित केला.नवी मुंबईतील या मतदारांमध्ये आता जागरूकता वाढत असून, ते आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात करत आहेत. पुढील निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्याचा निर्धार या मतदारांनी व्यक्त केला आहे. “आता आम्ही फक्त भावनांवर मतदान करणार नाही, आमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा देऊ,” असे कॉलनीतील एका तरुणाने ठामपणे सांगितले. तर, मतदारांच्या या नाराजीमुळे नवी मुंबईच्या राजकीय वातावरणात बदल घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

नवी मुंबईतील या मतदारांमध्ये आता जागरूकता वाढत असून, ते आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्यास सुरुवात करत आहेत. पुढील निवडणुकांमध्ये लोकप्रतिनिधींना त्यांच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्याचा निर्धार या मतदारांनी व्यक्त केला आहे. “आता आम्ही फक्त भावनांवर मतदान करणार नाही, आमच्या गरजा पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच पाठिंबा देऊ,” असे कॉलनीतील एका तरुणाने ठामपणे सांगितले. तर, मतदारांच्या या नाराजीमुळे नवी मुंबईच्या राजकीय वातावरणात बदल घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started