पालिका प्रशासन/प्रतिनिधी: ठाणे बेलापूर रस्त्यावरील ‘तुर्भे स्टोअर’ याठिकाणचे नियोजित उड्डाणपूलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच त्याखालील रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक माजी नगरसेवक आणि शिवसेना उपजिल्हाप्रमुख सुरेश कुलकर्णी यांनी नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे केली आहे.
सुरेश कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, जर रस्त्याची दुरुस्ती आधी केली आणि नंतर उड्डाणपूलाचे बांधकाम सुरू झाले, तर लाखो रुपये खर्चून दुरुस्त केलेला रस्ता पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे. यामुळे जनतेच्या कररूपी पैशाची उधळपट्टी केल्यासारखे होईल. त्यामुळे उड्डाणपूलाचे काम पूर्ण झाल्यानंतरच रस्त्याची दुरुस्ती हाती घ्यावी, असे कुलकर्णी त्यांनी सुचवले आहे.

