1–2 minutes

पालिका प्रशासन/प्रतिनिधी: नवी मुंबईतील पामबीच रस्ता हा शहरातील प्रमुख आणि वर्दळीचा मार्ग असला तरी येथील अपघात प्रवण क्षेत्रांमुळे हा रस्ता धोकादायक ठरत आहे. या रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि जीवितहानी टाळण्यासाठी ‘रोड सेफ्टी रोलिंग बॅरिअर्स’ लावण्याची तातडीची गरज असल्याची, मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.

पामबीच रस्त्यावरील काही ठिकाणी तीव्र वळणे, रस्त्याची रचना आणि वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे अपघातांचा धोका अधिक आहे. अशा परिस्थितीत रोलिंग बॅरिअर्स ही आधुनिक तंत्रज्ञानाची सुरक्षा यंत्रणा प्रभावी ठरू शकते. ही बॅरिअर्स वाहनांच्या टक्करेची तीव्रता कमी करतात, ज्यामुळे अपघात झाल्यास जीवितहानी टाळली जाऊ शकते. तसेच, व्यक्तींना होणारी दुखापत आणि वाहनांचे नुकसानही लक्षणीयरीत्या कमी होते.

तर, रोलिंग बॅरिअर्स हे अपघातांच्या परिणामांना कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. पामबीच रस्त्यावर दरवर्षी अनेक अपघात होतात. रोलिंग बॅरिअर्समुळे वाहनांचा वेग नियंत्रित होऊन अपघातांची तीव्रता कमी होईल.

नवी मुंबई महानगरपालिका आणि वाहतूक पोलिसांनी या रस्त्यावरील अपघात प्रवण क्षेत्रांचा अभ्यास करून रोलिंग बॅरिअर्स लावण्यासाठी सक्रियता दाखवली पाहिजे. तसेच, या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने जातात. रोलिंग बॅरिअर्स लावल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल आणि रस्ता सुरक्षित होईल.

रोड सेफ्टी रोलिंग बॅरिअर्स हे जगभरातील अनेक देशांमध्ये यशस्वीपणे वापरले जात आहेत. नवी मुंबईसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या शहरात अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. प्रशासनाने तातडीने यावर कार्यवाही करून पामबीच रस्त्याला अधिक सुरक्षित बनवावे, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started