पालिका प्रशासन/प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४वी जयंती मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. सेक्टर-१, सी.बी.डी. बेलापूर येथील सुनील गावास्कर मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समितीने केले आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षपद उद्योजक आयु. बाळासाहेब ढोबळे भूषवणार आहेत. सकाळी 10 वा. पंचशील ध्वजारोहण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन होईल. यानंतर भन्ते प्रज्ञावंत (कर्जत) यांचे धम्म प्रबोधन होईल. सकाळी 11.30 वाजता प्रमुख वक्ते म्हणून आयु. नंदाताई लोखंडे (एम.ए.,एम.एड.,पीएच.डी.,जालना) आणि आयु. जहिंद्र चव्हाण (एम.ए.,बी.एड.,आय.आय.टी. मुंबई) यांची प्रबोधनपर भाषणे होणार आहेत. त्यांच्या विचारांतून उपस्थितांना प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
सायंकाळी 6 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढली जाईल. यानंतर सायंकाळी 8 वा. “जागर समतेचा” या आंबेडकरी शाहिरी जलसा धम्मरक्षित रणदिवे आणि सहकारी यांच्याकडून सादर करण्यात येईल. हा कार्यक्रम उपस्थितांना सामाजिक जाणीव आणि प्रेरणा देणारा ठरेल. कार्यक्रमादरम्यान दुपारी 1 वा. आणि रात्री 10.30 वा. स्नेह भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे उपस्थितांना एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचा अनुभव घेता येईल.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या संयोजन समितीने केले आहे. समितीचे प्रमुख सदस्य आयु. पी.एम. कांबळे, आयु. आखाडे सर, आयु. मनीष कांबळे, आयु. मदन अहिरे, आयु. अंबर घोलप, आयु. शिवाजी देठे, आयु. बी.पी. गेडाम, आयु. प्रकाश सोनावले, आयु. भास्कर जगताप, आयु. सुधाकर मोरे, आयु. सतीश गाडे, आयु. अनंत जाधव, आयु. शेवाळे सर, आयु. हिरामण सोनावणे, आयु. कमलेश पाजारे, आयु. दीपक बोले, आयु. संतोष कांबळे आणि आयुनी विद्या पवार यांनी परिश्रम घेतले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याचे आवाहन केले आहे. “सविनय जयभीम”चा नारा देत समितीने समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रसारित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीने सर्व नागरिकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करण्याचे आवाहन केले आहे. “सविनय जयभीम”चा नारा देत समितीने समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश प्रसारित करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

