पालिका प्रशासन/प्रतिनिधी : एकेकाळी छत्रपती शिवरायांच्या आरमारात स्थान असलेला, “कोळीराजा” आज आपल्याच घरात उपरा झाला आहे. एकीकडे २०११ पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत दर्जा मिळाला पण शेकडो वर्षे असलेला कोळी पुनर्विकासाचा घोंगड भिजत पडलं आहे. त्याच बरोबर वाढते कुटुंब लक्षात घेता कोळीवाड्यातील कोळी बांधवांची घरे व जागा कायमस्वरूपी नसल्याने घरांची पुनर्बांधणी करतांना नवी मुंबई महानगरपालिका व सिडको यांच्या मार्फत तोडक कारवाई केली जाते. त्यामुळे घरांची पुनर्बाधणी करतांना नाहक त्रास होत आहे.
ही बाब लक्षात येताच बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या कार्यतत्पर आमदार मंदाताई म्हात्रे यांनी मुंबई येथील “सह्याद्री” अतिथी गृहावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. तसेच सदर संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी नवी मुंबईतील प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर बाबत नवी मुंबईतील कोळी बांधव, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील EWS / LIG घरातीलतील रहिवासी, मंदिर समिती अध्यक्ष पदाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत येत्या काही दिवसात लवकरात लवकर बैठक लावून सदर बाबत नियमवलीच्या कायद्याच्या चौकटीत बसून सदर प्रश्न कसा मार्गी लावता येईल व कोळी बांधवांना व नवी मुंबईकरांना कसा योग्य तो न्याय देण्यात येईल असे सांगण्यात आले.

