पालिका प्रशासन/प्रतिनिधी : काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) नावाचा वापर करून, तसेच ते RSS या हिंदू मार्गदर्शक संघटनेचे सदस्य असल्याचे भासवून हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे षडयंत्र सुरु असल्याची बाब निदर्शनास पडली आहे. तसेच हे काँग्रेसी पदाधिकारी व कार्यकर्ते आरएसएसच्या नावाखाली हिंदू समाजात गैरसमज पसरवत आहेत.
काँग्रेस हा पक्ष कायम हिंदूद्वेषी कारभाराचा जनक राहिला असून, काँग्रेस पक्षाने नेहमीच एका विशिष्ट अल्पसंख्याक समुदायाला खुश ठेवण्यासाठी हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार तसेच हिंदू धर्माभिमानी संघटना व संबंधित कार्यकर्त्यांना काँग्रेस सरकारच्या राज्यात मोठ्याप्रमाणात मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. मात्र सध्या देशात हिंदू धर्माचे वाढते प्राबल्य पाहून, RSS या हिंदू धर्म संरक्षण करणाऱ्या संघटनेचा वापर करून काँग्रेसचे काही पदाधिकारी हिंदू समाजातील नागरिकांमध्ये फुट पाडण्याचे षडयंत्र रचत आहेत. ज्यामध्ये हिंदुद्वेषी काँग्रेसी काही प्रमाणात यशस्वीही झाले आहेत. मात्र, याबद्दल RSSच्या संबंधित कार्यवाहक, प्रचारक यांबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिबंधित कारवाई नसल्याने काँग्रेसिंचे चांगलेच फावले आहे.
तर, काँग्रेसी पदाधिकारी आरएसएसचे कार्यकर्ते असल्याचे भासवून हिंदू समुदायाविरोधात द्वेष पसरवणारी विधाने करत आहेत. या विधानांमुळे हिंदू समाजात तणाव निर्माण होत असून, हिंदू समुदायात फूट पाडण्याची आणि द्वेष पसरण्याची शक्यता आहे. या घटनेमुळे हिंदू समुदयात तणाव निर्माण झाला असून, याप्रकरणी योग्य ती कार्यवाही गृहखात्याकडून करण्याची मागणी होत आहे.

