1–2 minutes

नवी मुंबई / पालिका प्रशासन : पोलीस कर्मचाऱ्यांची कमतरता, महिला पोलीस कमी संख्या, आंदोलने, व्हीआयपी बंदोबस्त आणि कार्यालयीन कामकाज अश्या चक्रव्ह्यूवात नवी मुंबई पोलीस दलातील महिला अधिकारी आणि कर्मचारी अडकून पडल्या आहेत. ज्यामुळे, या महिलांना व्यक्तिगत आणि वैवाहिक जीवनात विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

पोलीस दलात भरती होण्यासाठी विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण तसेच अतिदुर्गम भागातून महिला वर्ग प्रयत्नशील असतो. शहरी भागातून क्वचितच महिला पोलीस दलात भरतीसाठी कमी प्रयत्न करतात. मात्र पोलीस दलात जनसेवेचे टार्गेट घेऊन भरती होणाऱ्या, महिलांना कामाच्या वेळेत अनेक कामकाजीय समस्यांशी झगडावे लागते.

नवी मुंबई पोलीस दलात महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या आवश्यकतेपेक्षा कमी असल्याने, रुजू असणाऱ्या महिलांना जास्त वेळ कामकाज करावे लागते. तर महिलांवर होणारे अत्याचार व अन्यायात सातत्याने वाढ होत असल्याने, सदर तक्रारी नोंदवून घेणे व त्यांच्या तपास करणे याची जबाबदारीही थेट महिला पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांवर पडत आहे. कामावरील सततचा अतिरिक्त ताण, अचानकपणे रद्द होणाऱ्या साप्ताहिक सुट्ट्या, आजारी असतानाही पोलीस स्टेशनमधून येणारे फोन यामुळे नवी मुंबईतील पोलीस आयुक्त क्षेत्रातील बहुतांश महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी वैफल्यग्रस्त तणावाचे बळी ठरत आहेत.

ज्याकडे, राज्य शासनाच्या गृह मंत्रालयाचे दुर्लक्ष होत असून, नवी मुंबईतील स्थानिक महिला आमदार मंदाताई म्हात्रे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यामध्ये व्यक्तिगत लक्ष घालतील, असा विश्वास या महिला पोलिसांना आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started