1–2 minutes

पालिका प्रशासन/विशेष वृत्त : मनात कमळ आणि हातात फक्त दिखाव्यासाठी तुतारी असा दिखावूपणा केल्याबद्दल, महाविकास आघाडीचे बेलापूर विधनासभेतून संदीप नाईक यांचा परभाव केला असल्याचे स्पष्ट झाले आहे. व या पराभावाचे मानकरी असणारे आज ज्या भाजपने संदीप नाईक यांचा पराभाव केला त्याच पक्षाच्या आमदाराला कॅबिनेट मंत्री पदाच्या बहुमानाचे अभिनंदन बॅनर सर्विकडे झळकवत आहेत. त्यामुळे, संदीप नाईक यांना निवडणुकीत पाडण्याचे षडयंत्र काही माजी नगरसेवकांनी रचले होते की काय? अशी शंका आता निर्माण होत आहे.

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष म्हणून, दीड वर्षांच्या कार्यकाळात भाजपच्या कमळ या चिन्हाला, नवी मुंबईतील घरा घरात पोहचवणारे, संदीप नाईक यांना ऐनवेळी विधनासभेची उमेदवारी नाकारली, ज्यामुळे व्यथित होवून संदीप नाईक यांनी भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देवून आपल्या पंचवीसहुन अधिक समर्थक माजी नगरसेवक आणि प्रमुख कार्यकर्त्यांसहित भाजपला सोडचिठ्ठी देवून, मतदानाच्या अवघ्या 23 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. बेलापूर विधनासभेची उमेदवारी मिळवली आणि निवडणूक लढवली  परंतु त्यांना मात्र 377 मतांनी पराभाव स्वीकारावा लागला. मात्र संदीप नाईक यांचे पिताश्री आमदार गणेश नाईक यांनी भाजपची साथ सोडली नाही व विक्रमी अश्या 91 हजार मताधिक्याने ऐरोली विधानसभेतून विजय प्राप्त केला.

ज्याचे फळ पक्षाने त्यांची कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती करून दिले. ज्याच्या अभिनंदनाचे बॅनर संदीप नाईक यांच्यासोबत तुतारी हाती घेतलेल्या बेलापूर विधनासभेतील माजी नगरसेवकांनी विविध सोशिअल मीडिया माध्यमांवर झळकावले आहेत, तर शहरात ठिकठिकाणीही लावले आहेत. तर अनेकांनी फटाके फोडत मिठाई वाटून गणेश नाईक यांना मंत्रिपद मिळाल्याचा आनंद उत्सव साजरा केला.

हा सर्व घटनाक्रम पाहता, संदीप नाईक यांनी स्वतःचे अस्तित्व आणि स्वाभिमान जपण्यासाठी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. परंतु भाजपच्या गणेश नाईक यांना कॅबिनेट पद मिळाल्यावर, लगेचच संदीप नाईक यांच्या संघर्षरूपी स्वाभिमानाला तेच माजी नगरसेवक व कार्यकर्ते तिलांजली देत आहेत, ज्यांच्या वॉर्डातून संदीप नाईक मतांनी पिछाडीवर होते.

त्यामुळे, संदीप नाईकांसोबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेल्या आणि संदीप नाईक विधानसभा निवडणूक हरल्यावर, भाजपच्या गणेश नाईक यांना अभिनंदन करण्यात पुढे असणाऱ्या ‘त्या’ माजी नगरसेवकांनी अधोरेखित केले आहे की, “सत्तेपुढे शहाणपण चालत नाही” आणि नगरसेवक पदावर पुन्हा निवडून यायचे असेल तर, कमळ हाती घेण्याशिवाय पर्याय नाही..! कारण, आमदार ताईंना विरोध करण्याची धमक ‘या’ माजी नगरसेवकांमध्ये नाही, त्यामुळेच ते मंत्री दादांचे सुरक्षा कवच आता घेवू इच्छित आहेत.


Design a site like this with WordPress.com
Get started