प्रतिनिधी/पालिका प्रशासन : जनसेवा माझ्या नशिबी यावी, मायबाप जनतेची कामे माझ्या हाताने व्हावीत, आणि मायबाप जनतेला दिलासा मिळावा, हे उद्दिष्ट उराशी बाळगून मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे. त्यामुळे ‘मी आमदार बनलो तर, मायबाप जनता आमदार बनेल’ असे निस्वार्थी मत बेलापुर विधनासभेतून किटली या चिन्हावर निवडणूक लढवणारे, अपक्ष उमेदवार डॉ. मंगेश आमले यांनी व्यक्त केले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणुकीला अवघे काही दिवस राहिले असताना विरोधक गटातील नेत्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर डॉ. मंगेश आमले व त्यांच्या सहकाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आले खरे परंतु जर मी आता माझ्या डोळ्यांत पाणी घेऊन बसलो तर उद्या माझ्या जनतेच्या डोळ्यांत पाणी आणण्यासाठी हे विरोधक कमी करणार नाहीत या भावनेतून ते जिद्दीने उठले आणि जनतेचा पूर्ण पाठींबा आणि साथीदारांचा पूर्ण विश्वास घेऊन अपक्ष उमेदवारी लढण्याचे डॉ. मंगेश आमलेयांनी मनाशी पक्के केले. ते सिवूडसमधील प्रचार रॅलीत बोलत होते.
बेलापूर मतदार संघातील सर्वच धर्मातील जनतेचा त्यांच्या पाठीशी असलेला पाठींबा पाहता येणाऱ्या निवडणुकीत २०१ टक्के तेच निवडणूक येणार असल्याचा कौल मिळत आहे. सीवूड विभागामध्ये किटली चिन्हाची भव्य अशी प्रचार रॅली संपन्न झाली. ‘घामाचा एक थेंबही ज्यांनी या मतदार संघासाठी, पक्षासाठी खर्च केला नाही अश्या लोकांनी जरी पक्षाने तिकीट दिल असलं तरी माझ्या पाठीशी पूर्ण जनता आहे आणि माझी हि लढाई जिंकण्यासाठी नसून जनतेच्या मनातला आश्वासक चेहरा विधानभवनात पाठविण्यासाठी आहे कारण मी आमदार तर जनता आमदार असे प्रतिपादन डॉ. मंगेश आमले यांनी मतदारांशी संवाद साधताना केले.
तर किटली हे चिन्ह आणि डॉ. मंगेश आमले हे नाव घराघरापर्यंतच नाही तर लोकांच्या मनामनापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी हि आम्हा समर्थकांची आणि कार्यकर्त्यांची आहे कारण हि लढाई अन्यायाविरुद्ध आहे आणि जनतेला असाच नाही तर हाच उमेदार आमदार म्हणून हवा आहे असे ठाम मत यावेळी जनतेने व्यक्त केले. सर्व नियमांचे पालन करत शिस्तबद्ध पद्धतीने सुरु असलेली डॉ. मंगेश आमले यांची प्रचार रॅली पाहून विजयाचा गुलाल सुद्धा यांचाच असेल यात काही शंका नाही.



