प्रतिनिधी/पालिका प्रशासन : “राज्याचा पुढील मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा असेल” असे वक्तव्य जेव्हापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. तेव्हापासून, भाजपचे बहुतांश मतदार जे त्यांच्या पक्षीय उमेदवारावर नाराज आहेत, असे मतदार मनसेकडे आकर्षित होत असल्याचे बेलापूर विधानसभेत निदर्शनास पडत आहे.
राज्यात आगामी सरकार महायुतीचे येण्याची शक्यता आता जोर धरू लागली आहे. त्यात, मनसे प्रमुख राज ठाकरे हे सुद्धा पुढील सरकारमध्ये सामील होण्याची चिन्हे प्रथमदर्शनी दिसत आहेत. तर, बेलापूर विधानसभेतून भाजप महायुतीच्या उमेदवार मंदा म्हात्रे यांसोबत मित्रपक्ष सक्षमपणे उभे राहताना दिसत नाहीए. त्यामुळे, सुशिक्षित आणि डॅशिंग-बेधडक युवानेतृत्व असे मनसेचे उमेदवार गजानन काळे यांकडे भाजपचे बहुतांश मतदार पर्याय म्हणून पाहत आहेत.
तसेच, निवडणुकीनंतर मनसे महायुतीमध्ये सामील होण्याचे शक्यता असून जर पुढील मुख्यमंत्री भाजपचा बनवण्यासाठी सकारात्मक असेल. तर, बेलापूर विधानसभेतून मनसेच्या उमेदवाराला आमदार म्हणून विधानसभेत पाठवण्यात काय हरकत आहे? अशी चर्चा भाजप समर्थक मतदारांमध्ये आहे.

