प्रतिनिधी/पालिका प्रशासन : ऐरोली विधानसभेचे भाजप उमेदवार गणेश नाईक यांच्या प्रचार प्रणाली माजी महापौर सागर नाईक सांभाळत आहेत. परंतु, सागर नाईक व त्यांच्या साथीदारांनी महापालिकेच्या टेंडर प्रक्रियेत दिलेला त्रास आणि त्यामुळे दुखावलेले दादा समर्थक नगरसेवक तथा लोकप्रतिनिधी सागर नाईक यांच्यावरील राग दादांना हरवून काढणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.
शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या थेट बंडखोरीमुळे आगोदरच भारतीय जनता पार्टी महायुतीचे ऐरोली विधानसभेचे उमेदवार गणेश नाईक यांची निवडणूक जिंकण्याची वाट बिकट झाली आहे. त्यात, गणेश नाईक यांचे सुपुत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढवत आहे. त्यामुळे, मतदार आगोदरच गणेश नाईक यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमात आणि काहीसे नाराज आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या नागरी विकास कामांच्या निविदांमध्ये हस्तक्षेप करून, सदर निविदा प्रक्रियेत अडथळे आणून त्या कामांमध्ये विलंब निर्माण कसा होईल. यामध्ये सागर नाईक व त्यांची चांडाळचौकडी सक्रिय असल्याचे बोलले जाते. तसेच, स्वतःच्या खास कंत्राटदाराला टेंडर मिळावे यासाठी दुसऱ्या कंत्राटदारांना टेंडर मागे घेण्यासाठी दबाव टाकणे. अन्यथा आंदोलनाचे पत्र देवून काम बंद पाडणार, अश्या धमकी देण्याचे सत्र सागर नाईक यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याची चर्चा कायम पालिका मुख्यालयात रंगलेली असते.
आणि आता हेच सागर नाईक व त्यांचे सहकारी गणेश नाईक यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहे. त्यामुळे, नाईक समर्थक माजी नगरसेवक व लोकप्रतिनिधी नाराज असून अश्या परिस्थितीत जर गणेश नाईक पुन्हा आमदार बनले तर सागर नाईकांचा त्रास मोठ्याप्रमाणात सहन करावा लागेल. त्यामुळे, गणेश नाईकांना निवडणुकीत पाडून सागर नाईकांची मानेवर लटकणारी तलवार कायमची नामशेष करावी असे बहुतांश दादा समर्थकांनी ठरवले असल्याचे समजते. त्यामुळे, माजी महापौरांवरील रोषाचा फटका गणेश नाईकांना त्यांच्या अपयशाने चुकवावा लागण्याची शक्यता ऐरोली विधानसभेत वर्तवली जात आहे.

