प्रतिनिधी/पालिका प्रशासन : शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व आणि यशस्वी उद्योजक अशी ओळख असणारे प्रीतम म्हात्रे उरण विधानसभेतून निवडणूकीच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरले असून, ते एकतर्फी विजय प्राप्त करतील असा अंदाज राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
पनवेल महानगरपालिकेत विरोधी पक्षनेते पद भूषवलेले आणि अभ्यासू युवा नेतृत्व अशी प्रीतम म्हात्रे यांची ओळख आहे. उरण विधानसभा हा कायम शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात माजी आमदार विवेक पाटील यांना गोवण्यात आल्याने, हि विधानसभा मागील दोनवेळेस एकदा शिवसेनेकडे आणि नंतर भाजपच्या बंडखोर उमेदवाराकडे गेली होती.
२०१४ साली शिवसेनेचे मनोहर भोईर आणि २०१९ साली भाजपचे महेश बालदी याठिकाणी आमदार राहिले आहेत. परंतु, दोघेही जनविधायक कामे करण्यात अपयशी ठरले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहेत. तसेच, आमदार राहिलेले या दोघांना पैशाचा माज असल्याचा स्थानिकांचे म्हणणे आहे. यातील, बालदी हे तर स्थानिक भूमिपुत्रांना कमी लेखण्यात व आगरी-कोळी-कराडी समाजाचा पाणउतारा करण्यात कोणतीही सहजी सोडत नाही. अशी चर्चा आहे.
शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे स्थानिक भूमिपूत्र असून ते नम्र आणि मनमिळावू जनतेमध्ये मिसळणारे युवा नेतृत्व आहे. बालदी यांच्यासमोर आर्थिकदृष्ट्याही सक्षम आहेत. तसेच, स्थानिकांचे लढवय्या नेतृत्व विधानसभेत पाठवण्याचा चंग येथील मतदारांनी बांधला असून, प्रीतम म्हात्रे वनसाईड निवडणुकीत बाजी मारतील असे वातावरण उरण विधानसभेत निदर्शनास पडत आहे.

