प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधनासभेतून निवडणूक लढवण्यासाठी अचानकपणे नवीन चेहरे रिंगणात उतरले आहेत. असे चेहरे मतदारांना आकर्षित करण्यासाठी ऐनकेन प्रकरणाने प्रयत्नशील आहेत. मात्र, अश्या अचानकपणे आमदारकीची स्वप्ने रंगवणाऱ्या नवख्या चेहऱ्यांना मतदार साफ नाकारतात.
लोकसभा निवडणुकांच्या निकालांनंतर तापलेल्या विरोधी पक्षाच्या चुलीवर आपली स्वार्थीक राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी काही महिन्यांपूर्वीच हे नूतन चेहरे सामाजिक तर कधी नजरेस पडतील अश्या प्रसार माध्यमांधून दिसू लागले. विरोधी पक्षातील वरिष्ठ सदस्यांपैकी एकाच आपल्या डोक्यावर आशिर्वाद असल्याचे भासवून, त्या पक्षातील काही पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लक्ष्मीच्या जोरावर आपल्याकडे खेचण्यास सुरुवातही या अचानक उमेदवारांनी केली. मात्र, त्याच वरिष्ठांपैकी यांचा टप्प्यात कार्यक्रम करून थेट पक्षबाहेरचा रस्ता दाखवला गेला. तर, अडगळीत पडलेल्या आपल्या पक्षाला नव्याने उभारी मिळेल म्हणून काही पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तेही याच्या नादाला लागले होते. परंतु, उमेदवाराची माळ सक्षम नेतृत्वाच्या गळ्यात पडल्यावर या नव्या चेहऱ्याच्या बाजूने असणारे पक्षीय कार्यकर्ते छुमंतर झाले आहेत.
सध्या हे अचानक उमेदवार आपल्या कार्यालयातील कर्मचारी वृंदाची गर्दी सोबत घेवून, मतदारांच्या पुढ्यात जात आहेत. तर, घरी येणाऱ्या पाहुण्याला मान देण्याची परंपरा मतदार निभावत आहेत. परंतु, 20 नोव्हेंबरला याच उमेदवाराचा डब्बागुल होणार हे पण मतदार ठरवत आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जर आमदार होता आले असते तर प्रत्येक सोशिअल मीडिया इन्फ्लुएन्सर निवडून आला असता. त्यामुळे, बेलापूर विधानसभेतील आजतागायत न सुटलेले राज्यशासनाशी निगडित प्रश्न समस्यांची कसुभरही माहिती नसणारे व त्या कश्या सोडवण्यात येतील याबाबत ज्ञान नसणारे पोस्टारबाज नवखे उमेदवार किमान डिपॉजिट तरी वाचवू शकतील का?.

