प्रतिनिधी/पालिका प्रशासन : सत्ताधारी पक्षाचे आमदार, परिवार समर्थक नगरसेवक असतानाही ऐरोली विधानसभा क्षेत्रातील मूलभूत प्रश्न समस्यां सोडवण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या लोकप्रतिनिधींना यावेळी श्रीफळ देऊन, कायमचे हात जोडणार आहेत. असा आरोप वजा ईशारा ऐरोली विधानसभेतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे तरुण तडफदार उमेदवार ‘अंकुश कदम’ यांनी सत्ताधारी विरोधकांना दिला आहे. तर, राज्य शासनाच्या माध्यमातून मतदार संघातील नागरी विकास कामे करण्याएवजी पूर्णवेळ राजकारण करून स्व-परिवाराचे भले करण्यात दंग असणाऱ्यांनी ऐरोली विधानसभेतील नागरिकांना देशोधडीला लावले असल्याचे मत अंकुश कदम यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असणारे संभाजीराजे छत्रपती संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे नवी मुंबईतील ऐरोली विधानसभेचे उमेदवार अंकुश कदम यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी, मतदारसंघात प्रचाराचा एक टप्पा पूर्ण केला असून, अद्यापही नागरिकांना स्वच्छ आणि सततच्या पाणीपुरवठा प्राप्त होत नाही, तर अद्यापही मतदारसंघात शासकीय सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. ज्यामुळे, अस्वच्छ पाणी पिल्यावर नागरिकांना लुटारू खाजगी हॉस्पिटलची पायरी चढावी लागत असल्याचे दुःख अंकुश कदम यांनी व्यक्त केले.
तसेच, सैन्यदल व पोलीस भरतीसाठी शारीरिक सरावासाठी आवश्यक असणारे प्रशस्त मैदान मतदार संघात नसून, स्पर्धा परीक्षांसाठी कायमस्वरूपी मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका शासनाच्या माध्यमातून उभारण्यात आलेली नाही. त्यामुळे, आतापर्यंतच्या आमदारांनी त्यांचा आमदार निधी नक्की वापरलाय तरी कुठे? हा संशोधनाचा विषय ठरला असल्याचे अंकुश कदम यांनी म्हणले आहे.




