1–2 minutes

प्रतिनिधी / पालिका प्रशासन : मनसेचे बेलापूर विधानसभेचे अधिकृत उमेदवार गजानन काळे सोमवारी २८ ऑक्टोबर रोजी आगरी- कोळी भवन येथील निवडणूक कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नेरुळ सेक्टर- १२ येथील रामलीला मैदानापासून सकाळी दहा वाजता रॅली काढत, वाजत – गाजत गजानन काळे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संबंधित रॅलीमध्ये हजारो महिला – पुरुष नागरिक उपस्थित राहणार असल्याचे मनसेच्या सचिन कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गेल्या महिनाभरापासून मनसेने बेलापूर विधानसभेची जय्यत तयारी केल्याची पहावयास मिळत आहे. एका बाजूला इतर पक्षांमध्ये स्वार्थासाठी पक्षांतराची व बंडखोरीची कार्यवाही सुरू असताना दुसऱ्या बाजूला मनसेने मात्र परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून बेलापूर विधानसभेतील वातावरण ढवळून काढलेले आहे. रोजगार, शिक्षण, आरोग्य या माध्यमातून जनतेच्या मूलभूत प्रश्नांना हात घालत मनसेने नवी मुंबईकरांच्या मनामध्ये वेगळे स्थान निर्माण केलेले पाहावयास मिळत आहे. उमेदवारी अर्ज भरायला नेरूळ येथील रामलीला मैदानावर नवी मुंबईकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देखील याप्रसंगी मनसेने केलेले आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started