प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कॉन्ट्रॅक्टमधून स्थानिक नगरसेवकांना मिळणाऱ्या तथाकथित टक्केवारीतूनही ‘ना परिवार’ टक्केवारी घेतो, असा आरोप उपनेत्यांनी केला. परंतु, आपल्याच समर्थकांकडून भ्रष्ट मार्गाने प्राप्त पैशांतून मागणी करणे ही बाब सफेद पॅलेस मधील परिवार करत असेल, यावर नवी मुंबईकरांचा अजिबात विश्वास बसणार नाही. त्यामुळे, उपनेत्यांनी उगाच तोंडाच्या वाफा करू नयेत. अन्यथा, नवीन सिस्टीम अंमलात येईल.
रिक्षाने फिरणार व्यक्ती नगरसेवक बनल्यावर अचानक फॉर्च्युनर नाही तर इनोव्हा क्रीस्ता घेवून फिरायला सुरुवात करतो. आणि, 1bhk मधून आलिशान सोसायटीमधील 3/4bhk मध्ये शिफ्ट होतो. हे सर्व तो करतो पाच वर्षे काँट्रॅक्टकरकडून मिळणाऱ्या तथाकथित 10% कमिशनच्या जोरावर..! आणि, याच कमिशन मधून ‘ना परिवार’ कमिशन मागतो. ज्यामुळे, ‘ना परिवार’ समर्थकांच्या नगरसेवकांची संख्या विचारात घेतली तर, साधारण 70 नगरसेवक धरले तर ‘ना परिवार’ 2% कमिशन जरी नगरसेवकांकडून घेत असेल तरी, प्रतीवर्षी किमान दीड ते दोन कोटींची थेट रक्कम तथाकथित कमिशनच्या माध्यमातून ‘ना परिवाराला’ मिळत असावी.
मात्र, आपल्यासाठीच लढणाऱ्या सैनिकांकडून कमिशन/करवसुली करण्याची पद्धत ‘ना परिवार’ अवलंबत असेल ही बाब अविश्वसनिय आहे. त्यामुळे, उपनेत्यांनी आरोप करताना किमान एखाद्या पुरव्यनिशी केल्यास उत्तम राहील.

