1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधनासभेतून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटातून इच्छुक असणारे, परंतु संदीप नाईक यांना उमेदवारी मिळाल्याने थोडक्यात संधी हुकलेले डॉ. मंगेश आमले उद्या शनिवार दि. 26 ऑक्टोबर रोजी आपली भूमिका जाहीर करणार आहे. त्यामुळे, डॉ. आमले अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, प्रस्थापित मात्र विस्थापतांच्या राजकीय पक्षाच्या चिन्हाचा झेंडा खांद्यावर घेणार, याबाबतची उत्सुकता संबंध नवी मुंबईतील जनतेला लागली आहे.

राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाल्यापासून नवी मुंबईत आणि विशेषतः बेलापूर विधानसभा क्षेत्रात शरद पवार गटाचे अस्तित्व नव्हते. जिल्हाध्यक्ष तुर्भे तर महिला जिल्हाध्यक्षा सिवूडस – दारावे मध्ये राहूनही वॉर्डाबाहेर दोघांचेही अस्तिव नव्हते. ज्यामुळे, पक्ष ज्या-त्या वॉर्डापुर्तीच सीमित झाला होता.

परंतु, उच्चशिक्षित उद्योगपती डॉ. मंगेश आमले यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये प्राण ओतला, आणि गेली पाच महिने बेलापूर विधानसभेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची तुतारी वाजेल असे वातावरण निर्माण केले.

परंतु, ऐन टप्प्यात पक्षीय व्यवहाराने आणि जुन्या संबंधांच्या जोरावर नाईकांनी घात केला व उमेदवारीच्या शर्यतीतून डॉ. आमले यांना बाहेर केले. मात्र, पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील लढवय्या जन्मभूमीतून असणारे, तसेच पँथर चळवळीतील जनसामान्यांची सेवा करण्याच्या धगधगत्या आगीने मंगेश आमले यांना स्वस्थ बसू दिले नाही. व त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरून विजयश्री खेचून आणण्याचा चंग उराशी बांधला आहे. ज्याचा शंखनाद येत्या शनिवारी विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यकर्त्यांच्या व समर्थकांच्या साक्षीने होणार असल्याचे


Design a site like this with WordPress.com
Get started