प्रतिनिधी/पालिका प्रशासन : महायुतीमधील भाजपने ऐरोली विधानसभेतून गणेश नाईक यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. परंतु, मुलगा संदीप नाईक यांना बेलापूर मधून उमेदवारी देण्यास पक्षाने थेट नकार दिल्याने, नाईक परिवाराने राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात जावून नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा लढवाव्यात अशी मनधरणी त्यांचे समर्थक करत आहेत. तसा निर्णय नाईकांनी घेतल्यास शिवसेना जिल्हाप्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक विजय चौगुले ऐरोली विधनासभेतून निवडणूक लढवण्यास पूर्णतः सज्ज आहे.
त्यामुळे, नाईकांनी उमेदवारी जाहीर होऊनही जर भाजप सोडला तर महायुतीमधील मित्रपक्ष म्हणून शिवसेना ऐरोली विधानसभा पूर्ण ताकदीनिशी लढेल आणि मोठ्या फरकाने विजयश्री खेचून आणेल. असा दृढ आत्मविश्वास शिवसैनिकांनमध्ये आहे.

