1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील दोन्ही विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी भाजपकडूनच हवी, या हट्टापायी ‘नाईक’ परिवार (गणेश नाईक, संदीप नाईक, संजीव नाईक, सागर नाईक व ईतर नाईक) पक्ष सोडण्यास तयार असल्याच्या वावड्या विविध सूत्रांच्या माध्यमातून दर दोन तासांनी विविध प्रसार माध्यमांवरून गेल्या 72 तास उठत आहेत.

परंतु, नाईक परिवार भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या मनस्थितीत नसल्याचे एकंदरीत राजकीय वातावरणातून प्रथमदर्शनी दिसत आहे. बेलापुर विधनासभेतून भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक इच्छुक आहेत. मात्र, विद्यमान आमदार मंदाताई म्हात्रे यांना बाजूला करणे पक्षाच्या कार्यप्रणालीत बसत नाहीए. ज्यामुळे, यंग ब्रिगेड नाईक समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. तर, दुसरीकडे सातत्याने ‘नाईक’ हे अनुक्रमे तुतारी, मशाल हाती घेणार तर कधी अपक्ष लढणार अश्या सूत्रांच्या आधारावरील बातम्यांमुळे नवी मुंबईचे राजकारण तापले आहे. परंतु, अद्यापही नाईक परिवार भाजपला सोडचिट्ठी देण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीए.

तर, नाईकांनी भाजप सोडावा यासाठी विरोधकही अप्रत्यक्षपणे आक्रमक असून, नाईकांनी अपक्ष निवडणूक लढल्यास विरोधकांना निवडणूक जिंकणे थोडे सोपे होईल. असा मतीतार्थ काढला जात आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started