प्रतिनिधी/पालिका प्रशासन : पक्षाने बेलापूर विधनासभेतून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले असून, फक्त यादी जाहीर करण्याची औपचारिकता बाकी राहिली आहे. ज्यामुळे नवी मुंबई जिल्हा भाजप तसेच आ. मंदाताई म्हात्रे समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर, मंदाताई म्हात्रे यांना तिसऱ्यांदा आमदार बनवून पक्षाची हायट्रिक विजयी झेंडा विधानसभेत फडकणार आहे.
आ. मंदाताई म्हात्रे यांनी आपल्या आमदार निधीच्या माध्यमातून मतदार संघात विविध विकास कामे केली. ज्यामध्ये, महाराष्ट्र भवन, सुपेरस्पेशालिस्ट हॉस्पिटल व मेडिकल कॉलेज, स्मार्ट व्हिलेज, विश्वशांतीचे संदेशवाहक गौतम बुद्ध यांचा पुतळा ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे उभारणे यांसारख्या वाखण्याजोगे नागरी कामांचा समावेश आहे. तसेच, सातत्याने राज्य शासनाशी निगडित प्रश्न समस्यांवर अध्ययन करणे व त्या सोडविण्यासाठी सबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करणे. ज्यामुळे, क्लिष्ट प्रश्न सोडवण्यात आ. म्हात्रे यांना वेळोवेळी यश आले आहे.
तसेच महिला आमदार असूनही, स्वतःला मर्यादित न ठेवता ज्येष्ठ नागरिक वयामध्येही तरुण लोकप्रतिनिधीसारखे अविरत नागरिकांसाठी सक्रिय राहण्याची सेवाआवड पाहता, पक्षानेही मंदाताई म्हात्रे यांनाच तिसऱ्यांदा संधी देण्याचे अंतिम केले आहे. ज्यामुळे, बेलापूर विधानसभेत ‘न भूतो न भविष्यती’ असा इतिहास रचण्यासाठी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थक मतदार सुसज्ज झाले आहेत.

