प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधनासभेतून भाजपकडून अतिशय इच्छुक असणारे भाई नाईकांना उमेदवारी मिळणार नसल्याचे जवळजवळ पक्षाने सूचित केले असल्याचे समजते. त्यामुळे, आसपासची मंडळी भाईंना अपक्ष निवडणूक लढवण्याचा बिनबुडाचा सल्ला देत आहे. परंतु, सूक्ष्म अभ्यासू भाई सर्वांगीन विचार करून पाहता, अपक्षाचे विष पिण्यापासून स्वतःला रोखतील असे वाटते.
बाजूच्या मतदार संघात प्रथम आमदारकीचा अनुभव असणाऱ्या भाईंना बेलापूर विधानसभेतून निवडणूक लढवायची गंभीर ईच्छा आहे. परंतु, एक कुटुंब एक उमेदवारी आणि 2014 साली जायंट किलर ठरलेल्या दोन वेळा भाजप विद्यमान आमदार ताईंना पायउतार होण्यास सांगणे पक्षाच्या विचारधारेत बसत नाही अथवा कोणी बसवुही शकत नाही.
त्यामुळे, भाईंची प्रचंड निराशा झाली असून, त्यांनी आता ‘अपक्ष’ निवडणूक लढवावी अशी त्यांच्या सभोवताल वावरणाऱ्या मातब्बर स्थानिक मा. नगरसेवकांची आणि समर्थकांची ईच्छा आहे. शहरालाही उमद्या व तरुण नेतृत्वाची गरज आहे. मात्र, बेलापूरच्या अनुभवी विद्यमान आमदार ताईंना बाजूला सारून नवी मुंबईतील दोन्ही विधनासभेवर एकाच परिवारातील सदस्यांना उमेदवारी सोपवण्याचे धारिष्ट्य व स्वारस्य पक्षीय वरिष्ठांमध्ये दिसून येत नाही.
तर, दोन्ही विधनासभेतून अनुक्रमे भाई आणि दादांनी अपक्ष निवडणूक लढवून अर्थात “अपक्षाचे विष प्राशन करून निळकंठ होऊन इतिहास घडवतील की, इतिहासात जमा होतील” हे पुढील 48 तासांमध्ये स्पष्ट होईल.

