प्रतिनिधी/पालिका प्रशासन : नवी मुंबईतील मातब्बर नेते गणेश नाईक यांच्यासमोर ऐरोली विधानसभेतून काँग्रेसने युवा नेते अनिकेत म्हात्रे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी दिली तरच, या दोघांमध्ये काटेकी टक्कर होईल. आणि, महाविकास आघाडीला या विधानसभेत जिंकण्याची शक्यता निर्माण होईल.
महाविकास आघाडीतील पक्षांकडून जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच ऐरोली विधानसभा शिवसेना उबाठा गटाला सुटली असल्याची आरोळी उठली. ज्यामुळे, गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कार्यरत असणारे काँग्रेसचे युवानेते अनिकेत म्हात्रे यांच्या समर्थकांमध्ये तसेच, काँग्रेस पक्षात नाराजीचा सूर पाहिला मिळाला.
मात्र, शिवसेना उबाठा मधील माजी खासदाराच्या आवडीचा संभाव्य उमेदवारावर खंडणीचा गुन्हा दाखल असून, सदर व्यक्तीला याआधी तडीपारही करण्यात आले होता. तसेच, उबाठा गटाच्या या संभाव्य उमेदवाराकडे स्वतः नगरसेवक म्ह्णून निवडून आलेल्या वॉर्डामध्येही मत्ताधिक्य नसल्याचे गत लोकसभा निवडणुकीत समोर आले.
तर, दुसरीकडे काँग्रसेचे युवानेते अनिकेत म्हात्रे यांनी ‘काहीतरी कर, नवी मुंबईकर’ या जनआंदोलनाच्या माध्यमातून विधानसभेतील मूळ गावठाण, झोपडपट्टी आणि कॉलनी भागातील नागरिकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे, गणेश नाईकांसारख्या मातब्बर भाजप नेत्याला अपयशाचा घाट दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने काँग्रेसचे अनिकेत म्हात्रे यांना उमेदवारी दिल्यास उत्तम राहील. तसेच अन्य उमेदवार जाहीर केल्यास निवडणुक निकालांच्या पूर्वीच गणेश नाईकांना विजयी अभिनंदनाचे शुभेच्छांचे बॅनर झळकतील.

