प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधानसभेतील महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार विजय नाहटा हे NCP शरदचंद्र पवार पक्षात, मोठ्या संख्येने समर्थकांच्या उपस्थितीत व सोबत प्रवेश करणार असून, त्यादिवशी विरोधकांना धडकी भरणार आहे.
नवी मुंबईतील ‘जेंटलमन पॉलिटीशियन’ अशी ओळख असणारे उच्चशिक्षित (LLB) माजी सनदी अधिकारी विजय नाहटा यांनी बेलापूर विधनासभेतून जनतेच्या आशिर्वादाने एकतर्फी यश संपादन होणार असल्याचा विश्वास नाहटा यांच्या समर्थकांना आहे. शिंदेंसेनेला सोडचिट्ठी दिल्याने, विजय नाहटा 48 तासांमध्ये NCP शरद पवार गटात प्रवेश करणार होते.
परंतु, घाईगडबडीत नव्हे तर रॉयल एंट्री करायची या उद्दिष्टाने समर्थकांचे मत ठरले. त्यामुळे, विजय नाहटा यांची नव्या पक्षात ग्रँड एंट्रीचा कार्यक्रम ठरला असून, सदर पक्ष प्रवेश विरोधकांवर राजकीयदृष्ट्या मानसिक दडपण निर्माण करणारा ठरणार आहे.

