1–2 minutes

प्रतिनिधी/पालिका प्रशासन : बेलापूर विधनासभेतून मंदाताई म्हात्रे यांना पुनश्च भाजपने उमेदवारी दिल्यास, सरकारवर विरोधी मतदानाचा फायदा होवून यश संपादन करणे सोपे जाईल, असा समज ‘विजय नाहटा’ यांचा झाला असल्यानेच, नाहटा हे नवी मुंबईतील दोन्ही उमेदवारी नाईक परिवारातील सदस्यांना मिळाली असल्याचा ‘आकाशवाणी’युक्त कांगावा करत आहे. अशी चर्चा राजकीय धुरंदरांमध्ये रंगली आहे.

शिंदे सेनेतील सर्वांत प्रशासकीय अनुभवी आणि उच्चशिक्षित असे एकमेव नेते असणारे विजय नाहटा यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय नाहटा यांनी बेलापूर आणि ऐरोली विधानसभा या दोन्हीकडून नाईक परिवारातील सदस्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याने घेतला असल्याचे सांगितले.

परंतु, नवी मुंबईतील दोन्ही विधानसभेतून उमेदवार कोण दयायचे हे अद्यापही भाजपकडून अंतिम झालेले नाही. तर, पक्षाने संदीप नाईक यांना बेलापूर विधनासभेतून उमेदवारी दिल्यास लढाई काटे की टक्कर ठरू शकते व यामध्ये संदीप नाईक सरस ठरू शकतात, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. परंतु, त्यागोदरच नाईकांच्या विरोधात वातावरण तयार करून, पुन्हा बेलापूर विधानसभेतून विद्यमान आमदारांना उमेदवारी मिळावी आणि आपला विजय सोपा करून घेण्याचे छुपे षडयंत्र विजय नाहटा यांचे असल्याचे समजते. त्यामुळे, विजय नाहटा यांचा तुतारी हाती घेण्याचा निर्णय जरी व्यक्तिगत असेल, तरी नाईकांना दोन्ही विधानसभा मिळणार असल्याचा नरेटिव्ह सेट करण्याचे त्यांचे षडयंत्र हे पूर्णतः स्वार्थीपणाचे आहे.

तर दुसरीकडे आपल्या आमदार फंडातून नागरी विकास कामांचे भूमिपूजन, उदघाटन लोकार्पणाचा धडाका लावल्याने ‘नाहटा’ यांचे समीकरण दोन्हीकडून फसणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


Design a site like this with WordPress.com
Get started