1–2 minutes

नवी मुंबई/पालिका प्रशासन : मागील 40 वर्षापासून प्रलंबित असलेला प्रकल्पग्रस्त बांधवांचा गरजेपीटी बांधण्यात आलेला घराचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी कार्यकर्त्यासह आई एकविरा मातेचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले. स्थानिक प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यात यावेत म्हणून विजय नाहटा यांनी सिडको आणि नगरविकास मंत्रालयात सातत्याने पाठपुरावा केला. अनेक तांत्रिक अडचणी आणि बाजूचा अभ्यास करून हा प्रश्न सोडवण्याचे विजय नाहटा यांनी स्थानिक प्रकल्पग्रस्त बांधवांना आश्वासन दिले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यापूर्वी नगरविकास मंत्री असताना हा प्रश्न सोडवला होता. परंतु अध्यादेश काढण्यासाठी थोडा विलंब लागत होता. प्रकल्पग्रस्त बांधवांच्या जिव्हाळ्याचा असणारा प्रश्न नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के, विजय नाहटा, किशोर पाटकर यांनी सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, नगर विकासाचे प्रधान सचिव यांच्याशी वारंवार मिटिंग करून अध्यादेशाचा मार्ग मोकळा करुन घेतला आहे. त्याबाबत एकविरा आईचे आभार आणि आशीर्वाद घेण्यासाठी शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी कार्यकर्त्यांसह कार्लागाव येथील एकविरा देवीचे दर्शन घेतले.


यावेळी विजय नाहटा यांच्यासोबत ज्ञानेश्वर सुतार,सरोजताई पाटील, दीपक सिंग,आतिष घरत, भावेश पाटील,शिरीष पाटील, संजय वासकर, निहाल वास्कर,दीपेश म्हात्रे,कल्पेश पाटील,मिथुन पाटील,मनोज भोईर,दिलीप ठाकूर,बाळा पाटील, संजय भोईर,जयेश वाजंत्री,विवेक सुतार,तुषार पाटील,आकाश पाटील, महिला पदाधिकारी गीता पाटील,स्मिता सुर्वे,स्नेहा पवार इत्यादी उपस्थित होते. कारले गाव एकविरा देवी मंदिर प्रशासनाच्या वतीने आणि स्थानिक सरपंच पूजा अशोक पडवळ ,उपसरपंच शंकर बोरकर यांनी विजय नाहटा आणि सहपदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.


Design a site like this with WordPress.com
Get started