पनवेल/पालिका प्रशासन : ‘परदेशात जाऊन सातत्याने भारताची बदनामी करण्याचा उद्योग लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी करत आहेत. परदेशात जाऊन मनाला येईल ते बरळणे, बेछूट आरोप करणे लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मात्र, त्यांच्या वक्तव्याने काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला आहे. भारत हा सामाजिकदृष्ट्या प्रगल्भ झाल्यानंतर देशातील आरक्षण संपविण्याचा विचार काँग्रेस पक्ष करेल, असे विधान राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्याच्यादरम्यान वॉशिंग्टनमधील जॉर्जटाऊन विद्यापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधताना केले.‘आरक्षण संपवण्याचा मनसुबा राहुल गांधी यांनी अमेरिकेत व्यक्त केला त्यामुळे काँग्रेसच्या या आरक्षणविरोधी भूमिकेचा पनवेलमध्ये भाजपच्यावतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनास भाजपचे जिल्हा सरचिटणीस ऍड. प्रकाश बिनेदार, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमित जाधव, अनुसूचित जमाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बंडू शिद, भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष प्रवीण पाटील, कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील, माजी नगरसेवक अजय बहिरा, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा कमला देशेकर, अनंता गायकवाड, अविनाश गायकवाड, दीपक शिंदे, ज्योती देशमाने, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, विद्या तामखेडे, युवामोर्चा उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, पनवेल शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

